ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने एसटीचा संप फेल?

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. पंरतु महामंडळाच्या दावा केला आहे की राज्यातील २५० आगारातील सर्व बस सकाळी मार्गस्थ झाल्या, त्यामुळे सदावर्ते यांच्या संघटनेचा संप फेल गेला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


नागराज मंजुळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीचे वक्तव्य चर्चेत.

गुणवंत सदावर्ते यांनी दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारण्यात आल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. दरम्यान एसटीच्या इतर बऱ्याच संघटना संपात नव्हत्या. त्यांनी सदावर्ते यांच्यावर टीकाही केली होती. दरम्यान एसटी महामंडळाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. 


या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील २५० आगारांतील सकाळी ७ वाजेपर्यंतच्या सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरून निघाले आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग,या विविध मागण्यांसाठी एसटी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी पाठिंबा दिला.
 या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली होती. 


सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही खोटा ठरताना दिसतोय. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने