राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याच्या घरावर सीबीआयची छापेमारी. सीबीआयकडून गुन्हा हि दाखल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या मुंबई-नागपूर सह विविध घरावर Cbi कडून छापेमारी आज पहाटेपासून करण्यात आली. माजी पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुली यासंदर्भात आरोप केल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते, याच पार्श्वभूमीवर देशमुख यांची काही दिवसांपूर्वी सीबीआयने चौकशी केली होती आज पहाटेपासूनच सीबीआयनेआणि अनिल देशमुख यांच्या विविध घरावर तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याही घराची तपासणी करून दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.  



काय आहे प्रकरण ?

25 फेब्रुवारी रोजी देशाचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्कार्पिओ गाडीमध्ये जिलेटिन च्या काड्या आढळून आल्या होत्या, यानंतर काही दिवसांनीच स्कार्पिओ गाडी चे मालक मनसुख हिरेन यांचे तपासात नाव समोर आले असताना स्कार्पिओ गाडी चे मालक हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचे नाव समोर आले. 

संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाजे प्रकरण  विधिमंडळातही गदारोळ झाला होता याच पार्श्‍वभूमीवर सचिन वाजे यांच्या नियुक्ती आदेश कोण  दिले याचा तपास करण्यात आला.  यावेळी या सर्व घटनेचा घटनाक्रम पाहता महाराष्ट्राचे पोलीस महा संचालक परमवीर सिंग यांची राज्य सरकारने त्यांना पदावरून गच्छन्ती केली . महाराष्ट्राचे महासंचालक परमवीर सिंग यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर मीडियासमोर अनिल देशमुख यांच्यावर  100 कोटी लाच मागितल्याचा आरोप केला यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने