महाराष्ट्राच्या अडचणींत आणखी वाढ जुलै-ऑगस्ट मध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता.?

महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या लाटेचा संसर्ग चालू असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जुलै - आँगस्ट या कालावधीत राज्यात कोरोना ची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. 
या तिसऱ्या लाटेपासून महाराष्ट्राचा बचाव करण्यासाठी शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयारी चालवली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 
मे अखेरपर्यंत राज्यांमधील कोरोना ची दुसरी लाट संपलेली असेल, यासह पुढील दिड महिन्याच्या कालावधीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्यासमोरील आरोग्य संकट अजून मोठे होत असल्याचे दिसून येत आहे.


कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. 

कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी देश-विदेशामध्ये लसीकरण मोहीम जोरदार राबवण्यात आली आहे, महाराष्ट्रातही आजपर्यंत दीड कोटीहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, लसीकरणा मधून कोरोना संसर्ग कमी केला जाऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने