एकनाथ शिंदे सुरतेच्या वाटेवर असताना उध्दव ठाकरे यांची फडणवींसाना आँफर? काय म्हणाले फडणवीस.

महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासामध्ये कोणीही २१ जून २०२२ ही तारीख विसरणार नाही. कारण याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सुरतेला गेले होते. आणि पुढे आसाम मधील गुवाहाटीमध्ये. एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे बंड सर्वात मोठं ठरलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना एक ऑफर दिली होती. त्या ऑफरला आपण नकार दिला असे नुकत्याच झी चोवीस तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी?

“एकनाथ शिंदे हे जेव्हा सुरतला निघाले होते त्यावेळी मला तात्कालिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता. संजय राऊत व उध्दव ठाकरे यांनी जे काही झालं ते झालं आता हे सगळं थांबवा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा. अस फडणवीसांना म्हणाले. 
त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं की आता ती वेळ निघून गेली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांना आम्ही तोंडघशी पाडणार नाही. हे माझ्या आणि माझ्या पक्षाच्या धोरणात बसत नाही. “उद्धव ठाकरेंसोबत जाऊ ही वेळ आता निघून गेली असे फडणवीस यांनी मुलाखत देताना म्हटले आहे. 


आता उद्धव ठाकरेंशी हात मिळवणीची वेळ निघून गेली. मी बदला वगैरे म्हटलं होतं. संजय राऊत म्हणाले की आता एक व्हायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं पण आता ते शक्यच नाही. 
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. आम्ही सोबत चहा पिऊ शकतो. पण आता त्यांच्यसोबत जाऊ ही वेळच आता निघून गेली आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने