उध्दव ठाकरेंसाठी सुप्रीम कोर्टात लढवणारे कपिल सिब्बल एका दिवसाची घेतात इतकी फी!

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे कळते. सुप्रीम कोर्टात आधीच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावणी सुरू आहे. 

सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहेत. निवडणूक आयोगाच्या चिन्ह व पक्ष या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. कपिल सिब्बल हे देशभरात सर्वाधिक सुप्रसिद्ध विधीतज्ञ असून देशातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या वकिलांपैकी एक असल्याचंही बोललं जातं. 


कपिल सिब्बल गेल्या ५० वर्षापासून सुप्रिम कोर्टात विधीतज्ञ म्हणून काम पाहतात. काँग्रेसकडून ते अनेक वर्ष लोकसभा खासदार होते. यासह केंदीय मंञी म्हणूनही त्यानी काम पाहिले आहे. सध्या ते राज्यसभेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. 
कपिल सिब्बल यांनी केरळ सरकारची एका प्रकरणात बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी एकच दिवस सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी आले होते, यासाठी कपिल सिब्बल यांना 15.5 लाख रुपये मानधन घेतलं होते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने