नागराज मंजुळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीचे वक्तव्य चर्चेत.

मराठी सिनेचित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ २ या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच चिञपटाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात.आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. समाजामधील विविध विषमतेबद्दल ते आपल्या चिञपटातून भाष्य करतात.


नुकतेच नागराज मंजुळे यांनी नाळ २ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाजपासून केके मेनन, पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभव तसेच त्यांच्या खासगी आयुष्य बद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या.

या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “,छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम हे जास्त असते आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रात एकही असा व्यक्ती सापडणार नाही. ज्या व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराजांविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा नाही. शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व आहे. ज्यांच्यावर प्रत्येक जाती धर्माचे लोक प्रेम करतात. महाराज हे प्रत्येकासाठी त्यांच्या वडिलांप्रमाणे आहेत. आम्ही त्यांना शिवबा हाक मारतो. जसं ज्योतिबा असे महापुरुष एखाद्या जातीपुरत्याच मर्यादित नसतात ते सगळ्यांचा विचार करतात.”त्यामुळे नागराज मंजुळे म्हणाले की, ,”माझ्या मनात शिवाजी महाराजांपती प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आणि माझ्या मनात ही गोष्ट कोणीही शिकवण्याची गरज नाही. माझं त्यांच्याशी थेट नातं आहे. मी सदैव ही गोष्ट सांगत आहे की, जर बाबासाहेब आंबेडकर हे माझे वडील आहेत तर शिवाजी महाराज हे माझे आजोबा आहेत. याबरोबरच आंबेडकरवादी आणि जातीमुळे आपल्या झालेल्या अपमानाबद्दलही नागराज मंजुळे यांनी मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने भाष्य केले.


त्यांचा हा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड वायरल होत आहे. आणि त्यांच्या चाहतांच्या मनात त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदरा आणखीनच वाढलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने