चहाचे हॉटेल चालवणारा हा लोकप्रिय आमदार आहे महाराष्ट्रातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत. नक्की वाचा.

    पारनेर चे लोकप्रिय आमदार श्री. निलेश लंके यांची ओळख कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून आहे आणि पारनेर मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्यासाठी वाट्टेल ते करणारे लोकप्रतिनिधी  म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. पोटापाण्यासाठी त्यांनी हंगा स्टॅण्डवरचा हॉटेल टाकलं होते.  पण सामाजिक कार्यकर्त्यांकडून ते चहाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून  त्यांना हॉटेल  लवकरच बंद करावं लागलं. 


ग्रामपंचायत निवडणुकीत वय भारत नसताना भरला ग्रामपंचायतीत अर्ज

निलेश लंके यांनी कमी वयात शिवसेनेचे काम सुरु केले  शिवसेनेत काम सुरू केलं ग्रामपंचायतीसाठी त्यांनी अर्ज  दाखल केला परंतु वय कमी असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला, नंतर पाच वर्षाने ग्रामपंचायत लढवली आणि ते विजयी झाले. 

 त्यानंतर निलेश लंके यांनी  सुपा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि पंचायत समिती सदस्य झाले  राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने यावेळी त्यांना कलाटणी मिळाली आणि लंकेने मागे वळून पाहिलेच नाही निलेश लंके  पुढे पारनेर तालुका शिवसेना प्रमुख झाले.  




 एमआयडीसी तरुणांना नोकरी मिळवुन देण्यासाठी निलेश लंके यांनी मोठा संघर्ष केला गाव गावातील  वृद्धांना पेन्शन योजना सुरू केली त्यामुळे त्यांचा तालुक्यात दरारा वाढला मात्र ही यशाची वाटचाल सुरू असताना त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावे लागलं 

शिवसेना पदावरून हकालपट्टी केल्याचा दावा

निलेश लंके यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप झाला व पुढे त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने