भारतीय हिजाब वादात आता नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलालाची एंट्री, भारतीय नेत्यांना केलं 'हे' आवाहन

कर्नाटकातील सरकारी कॉलेजमध्ये व शाळांमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यावरून कर्नाटकमधील वाद देशभर पसरत असताना दिसून येत आहे. बहुतांशी सरकारी तसेच खासगी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वाद सुरू झाले आहेत. या संदर्भात सोशल मीडिया मध्ये एक व्हिडिओही हि व्हायरल झाला आहे.



या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर नोबेल शांतता पुरस्‍कार विजेती मलाला युसुफझाई यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामद्ये मलाला मुलींना हिजाब घालून शाळेत जाऊ देण्यापासून रोखणे भयंकर असल्याचे म्हटले आहे.

“कॉलेज शाळा मुलींना अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना हिजाब घालून शाळा कॉलेज मध्ये जाऊ देण्यापासून रोखणे भयंकर आणि चुकीचे आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लीम महिलांची हि उपेक्षा थांबवली पाहिजे.” असे मलाला यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने