वस्ताद लहुजी साळवे यांनी वडीलांच्या मृत्यूचा बदला इंग्रचाचा युनियन जॅक झेंडा उतरवूनच केला.

लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय शूर योध्ये होते, युद्ध कलेमध्ये त्यांची बरोबरी कोणीही करत नसे. त्याकाळी वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांनी केल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही लहुजीं साळवे यांचे पूर्वज होते. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण  तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या.


 पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे शिवाजी महाराज यांनी सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर कुटूंबियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट व त्यागाबद्दल शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने सन्मान केला होता. पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला. लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत इंग्रजांचा पराभव करू पाहत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी अखेर राघोजींना संपवले.


लहुजींचे वडील राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पुढे इ.स. १८१८मध्ये हिंदवी स्वराज्यचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची धग भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्तीमुळे लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. व आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्या गोष्टीचा बदला त्यांना घ्यायचा होता व देशाला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. व देश स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला. इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने