देवेंद्र फडणवीसांचे ‘ते’ ट्विट दाखवत मोदींच्या आरोपाची सुप्रिया सुळे यांनी केली पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना महाराष्ट्रात काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यांना मोफत तिकीटं काढुन देण्यात आली, असा आरोप केला होता. मोदींच्या या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट आणि रेल्वे सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानले होते तेंव्हाचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी  दाखवत पोलखोल केली. 



युपी, बिहार, पंजाब येथील स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. राज्य सरकारने केवळ गरिब मजुरांना त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना यावेळी त्या म्हणाल्या की, काल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राबाबत जे काही सांगितली. ही मला वैयक्तिकपणे दुःख देणारी महाराष्ट्र बदनाम करणारी गोष्ट आहे. ज्या राज्यानं भाजपचे १८ खासदार निवडून दिले. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा नागरिकांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड प्रसार केला म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

 पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला अत्यंत वाईट वाटले आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या, असे राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने