शिंदे सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या दिवशी टाकणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला असून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे प्रति शेतकरी रु. ६००० अनुदान दिले जाते. राज्य शासन या या अनुदानात आणखी रु.६००० इतक्या निधीची भर घालणारी "नमो शेतकरी महासन्मान निधी" ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्याला वर्षभरात सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे, शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारचे मिळून एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
 नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. १७२०.०० कोटी इतका निधी करिता शासनाची मान्यता देण्याबाबत शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना जाहीर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर निधी देण्याची घोषित करण्यात आले होते. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’साठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या शेतकरी सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 87 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

पहिला हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी सन्मान निधीसंदर्भात एक शासन निर्णय कृषी विभागानं 28 जुलै 2023 रोजी काढला आहे. त्यानुसार, “राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या नावानं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.”

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र नियम विकसित केले जातील. असंही या निर्णयात नमूद केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने