राज्यसभा खा. संजय राऊत यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग आणताच येत नाही. हे आहे कारण.

महाराष्ट्र विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्ष शेतकरी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना प्रश्नाचा भडिमार करत असताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ असे म्हटले. यामुळे काल दिवसभर सत्ताधाऱ्यानी संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेऊन त्यांच्याविरुद्ध हक्कभंग मागणी केली राऊत यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा अवमान केल्याचे म्हटले. विधिमंडळात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी रावतावर कारवाई होणार असे सतवास केले व सायंकाळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्क भंग समितीची घोषणा करून राऊतांसमोर अडचणी वाढवल्या परंतु राज्यसभा सदस्यावर असा हक्क भंग दाखलच करता येत नाही अशी माहिती समोर येत आहे.


राज्यसभा खासदारावर हक्क भंग फक्त राज्यसभाच आणु शकते असे विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितले. विधिमंडळ फक्त चौकशी करून सदर अहवाल माननीय राज्यसभेचे सभापती यांच्याकडे सादर करता येतो.
राज्यसभा सदस्यावर हक्क भंग प्रस्ताव विधिमंडळात आणता येत नाही त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे संसदीय प्रथा परंपरा आणि विशेष हक्क भंग कायद्याचा अवलंब करता त्यांनी हे प्रकरण राज्यसभेकडे पाठवलं पाहिजे संजय राऊत राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या विरोधात हक्क भंग आणण्यासाठी राज्यसभा हेच योग्य सभागृह आहे राज्यसभा सभापती हेच फक्त या संदर्भात कारवाई करू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने