लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सर्वात मोठी कारवाई, विरोधी पक्षांचे 33 खासदार निलंबित; निलंबनाचे कारण काय?

संसदेचं हिवााळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत अधिवेशनात कामकाज सुरू असताना अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रयत्नशील असताना लोकसभेत घुसखोरी प्रकरणावरून गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करून लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील बहुतांश खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. 



विशेष कालावधीसाठी निलंबित

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

काँग्रेस नेत्यांचाही निलंबनामध्ये समावेश

लोकसभा अध्यक्षांनी ज्या खासदारांना निलंबित केलं आहे. त्यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेससह टीएमसी खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे. शुक्रवारीच 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने