2024 लोकसभेतील पंतप्रधान पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे?

2024 ची लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तर्फे पंतप्रधान पदासाठी चेहरा देण्याची चर्चा काल अशोक हॉटेल नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीतील 28 पक्ष एकत्र येऊन यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी चे चेहरा असून त्यांना लोकसभेत विरोधासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार इंडिया आघाडीतर्फे देण्याचा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडला. त्यांनी यावेळी मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा म्हणून योग्य असतील असा ठराव मांडला या पंतप्रधान पदाच्या ठरावासाठी १६ घटक पक्षांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दर्शवला. 


नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकीचे परिणाम इंडिया आघाडीच्या बैठकांवर प्रभावित करणारे होते यामुळे अनेक इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे कालच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते, यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता मल्लिकार्जुन खर्गे यांनी २०२४ लोकसभा निवडणुक आधी जिंकू द्या त्यानंतर पंतप्रधान पदाचा चेहरा आपण ठरवूया असे मत मांडले यावरून असे निश्चित होते की इंडिया आघाडीने पंतप्रधान पदासाठी गांधी कुटुंबीयातील चेहरा न घेता काँग्रेसमधीलच दलित चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांना सर्वपक्षीय पसंती मिळू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने