पवार साहेब चुकलेच.. :- पवार साहेबांवर प्रेम करणार्‍या पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली परखड भावना.

पवार साहेब चुकलेच.. :- पवार साहेबांवर प्रेम करणार्‍या पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली परखड भावना 

  'शरद पवार पवार साहेबांना 60-70 च्या वर कधीही आमदार निवडून आणता आले नाही. पवार साहेबांना स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री होता आले नाही', असे काल मंत्री ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले.
     दिलीप वळसे पाटलांनी व शरद पवार साहेबांच्या कृपेने 15 - 15 वर्षे मंत्री राहीलेल्या प्रस्थापित नेत्यांनी आत्मपरीक्षण केले तर शरद पवार साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस चा मुख्यमंत्री स्वबळावर का होऊ शकला नाही याचे उत्तर मिळेल.


      पवार साहेब तुमचे चुकलेच.
पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्राच्या सरकार मध्ये काही नेत्यांना सातत्याने मंत्री पदे व सत्तेचे अधिकार दिले.या नेत्यांनी आपला मतदारसंघ वगळता जिल्हाभर ही पक्ष विस्तारासाठी काय प्रयत्न केले? उलट अनेकांनी तर जिल्हयात स्वतः शिवाय पक्षाचा  कोणी निवडुण येणार नाही ह्याची  काळजी घेतली. शरद पवार साहेबांना व पक्षाला जिल्हयात दुसरा पर्यायच दिसु द्यायचा नाही हे धोरण या नेत्यांनी राबविले.
  पवार साहेब, तुम्ही जर या प्रस्थापित नेत्यांचे लाड केले नसते व त्यांना त्यांच्या मतदारसंघाची व जिल्हयाची 'मालकी' दिली नसती तर आज कदाचित वेगळी परीस्थिती असती.
या नेत्यांनी सर्वसामान्य कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ताकद देण्यापेक्षा आपली स्वतः ची मुलं 'लॉंच' करण्यावर भर दिला. हे सगळे पवार साहेबांचे 1999 चे  तरूण नेते आता 15-18 वर्षे मंत्री पदे उपभोगून आता मंत्रीपदासाठी दुसर्‍या विचारांसोबत गेली आहेत. आता ही हे नेते स्वतःच्या मंत्री पदासह मुलाबाळांच्या सुरक्षित  राजकीय लॉंचिंग व राजकीय भविष्यासाठी' विचारहिन खस्ता खात आहेत. 

     पवार साहेब राजकीय दृष्ट्या अडचणीत आले की , महाराष्ट्रातील सर्व सामान्य पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता एकजुटीने साहेबांच्या पाठीशी उभा रहातो.. आत्ता ही उभा आहे.
      'निवडणूकी ला लढणार पवार साहेब आणि पुरोगामी कार्यकर्ता, आणि सत्ता आली की मीच' ह्या वळसे पाटलांसारख्या सर्वच प्रस्थापित नेत्यांच्या सत्तालोलूप दबावतंत्रांच्या धोरणामुळे पवारसाहेबांच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढली नाही. अशा अनेक प्रस्थापितांनी 15/15 वर्षे राज्यात मंत्री पद भोगून ही लोकसभेची निवडणूक लढवायची वेळ आली की रणांगणातून थातूरमातूर कारणे देत पळ काढला आहे. मग कशी पवारांची ताकद वाढणार होती? हे डजनभर कायम मंत्री असणारे काही काळानंतर विधानसभेऐवजी लोकसभेत गेले असते तर नवीन लोक आमदार झाले असते. असेच संक्रमण सातत्याने होत राहिले असते तर राज्य एकहाती आले असते सोबत केंद्रात ही पवार साहेबांची ताकद वाढली असती. 
     पण ज्यांनी सत्ता उपभोगून पक्षवाढीसाठी काहीही केले नाही, त्यांनीच टिका करायची हे पटण्यासारखे नाही.

डॉ. नरेंद्र काळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा पदवीधर विभाग प्रमुख, 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने