शरद पोंक्षेंची मुलगी झाली वैमानिक; म्हणाले, “कोणतीही सवलत,आरक्षण नसताना मिळवले यश''.

 मराठी चित्रपट सृष्टी असो की बॉलीवूड अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळतात. तर काही कलाकारांची मुले मात्र याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वर्षापासून आपल्या अभिनयाची छाट पडणारी अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र शरद पोंक्षेंची लेक सिद्धी ही वैमानिक झाली आहे. नुकतंच त्यांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीला होतोय गावामध्ये विरोध; मिरजेच्या दीडशे कुटुंबांनी सोडलं गाव

शरद पोंक्षे यांनी यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. आता नुकतंच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती वैमानिकही झाली आहे. नुकतंच शरद पोंक्षे यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
“कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा”, असे शरद पोंक्षेंनी म्हटले आहे.

शरद पोंक्षेची ही पोस्ट का ठरतेय वादग्रस्त.?
अभिनेत्रे शरद पोंक्षे यांनी वेळोवेळी नथुराम गोडसे यांच्या अनेक विचारांचे समर्थन केले आहे यामुळे ते सतत चर्चेमध्ये असतात. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे ते कायमच समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आरक्षण सवलती यावर अप्रत्यक्षपणे टीकाटिपणी केली आहे, यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या या पोस्टवर टीकात्मक सुर दिसून येत आहे.

महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर कोणाला मिळाला पहिला पुरस्कार. वाचा सविस्तर.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने