मणिपूर मधील तो व्हायरल व्हिडीओ मे महिन्यातील. महिलांना नग्न फिरवणारे कोण? संपुर्ण घटनाक्रम जाणुन घ्या.Manipur Violence

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. मणिपूर हिंसाचाराचे शेकडो व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. दोन महिलांना नग्न अवस्थेत नेलं जात असताना एक व्हायरल व्हिडीओ देशभर संतापाची लाट घेऊन आला. या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ माजली आहे. या व्हिडीओचे संसदेतही पडसाद उमटले, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपींना सोडणार नाही असे जाहीर केले. 



मणिपूर मध्ये दोन महिन्यापासून ऐवढी प्रंचड हिंसा का होतेय. ते जाणून घ्या.

मणिपूरची राजधानी इम्फाळ असून ती मणिपुरच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10 टक्के आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे 57 टक्के जनता या भागात वास्तव्यास आहे. यातील मणिपूरच्या सर्वञ जंगली भागात 43 टक्के लोक राहतात. राजधानी इम्फाळमध्ये मैतेई समाजाचे लोकं राहतात जे की हिंदू आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये मैतेई समाजाचे 53 टक्के आहेत. मणिपूर विधानसभेतील 60 जागांपैकी 40 आमदार हे मैतेई समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. उर्वरित डोंगराळ भागांमध्ये 33 विविध जमाती राहतात. यामध्ये नागा आणि कुकी या मुख्य जमाती असून या ख्रिस्ती धर्माच्या आहेत. यासह मणिपुरात 8 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत.

भारतीत संविधानानुसार कलम 371 सी नुसार मणिपूरच्या पर्वतीय आणि डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विशेष दर्जा आणि सुविधा दिल्या गेल्या आहेत.
 त्यासोबतच ‘लँड रिफॉर्म अॅक्ट’ या कायद्यामुळे बहुसंख्य असणार्‍या मैतेई समाजाच्या लोकांना पर्वतीय भागांमध्ये जमीन खरेदी करता येऊ शकत नाही. माञ सर्व इतर जमातीच्या लोकांना पर्वतीय भागामध्ये जमीन खरेदी करता येऊन स्थायिक होण्यासाठी कोणतंही बंधन नाही. यामुळे मणिपूरात विषमता निर्माण झाल्याचा समज तेथील मैतेई समाजामध्ये निर्माण झाला आहे यामुळे मैतेई व इतर समाजामधील मतभेद वाढले आहेत.


हिंसाचाराची पहिली ठिणगी कधी पडली? 

मणिपूरमधील चुरचंदपूर जिल्ह्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली.. या भागात कुकी आणि नागा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. या भागात सरकारी जमीन सर्वेक्षण सुरू होते यांच्या निषेधासाठी 28 एप्रिल रोजी द इंडिजेनस ट्राइबल लीडर्स फोरमने आठ तासांच्या बंदची हाक दिली. पंरतु या बंदला अचानक हिंसक स्वरूप प्राप्त झाले, यामध्ये वनविभागाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि आणि कुकी आदिवासी आमने-सामने आले. 

या घटनेनंतर पाचव्या दिवशी ‘ट्राइबल स्टूडेंट्स यूनियन ऑफ मणिपुर’ने आदिवासी एकता मार्च काढला. इथूनच या हिंसेला खरी सुरूवात झाली. मैतेई समाजाचे लोक या मार्चविरोधात एकत्र आले आणि त्यांनी विरोध केला.

एका बाजूला मैतेई समाजाचे लोक आणि दुसऱ्या बाजूला नागा आणि कुकी समाजाचे लोक आमनेसामने येऊ लागले. काही वेळातच या हिंसेला राज्यभर आक्रमक रूप धारण केले. चुरचंदपूर जिल्यामध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची जाहीर सभाआयोजित केली होती, मात्र तिथे हिंसक आंदोलकांनी आग लावली, यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करण्यात आली. आतापर्यंत मणिपूर हिसेंमध्ये 150 पेक्षा लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 3 हजारांंपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यासह सार्वजनिक मालमत्तेचे ही प्रंचड नुकसान झाले आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील आरोपी कोण?
देशभर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये नग्न अवस्थेतील असणारी महिला ही कुकी समाजाची प्राथमिक माहिती आहे . हा व्हिडीओ जुना म्हणजे 4 मेचा असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांची मैतेई समाजाच्या लोकांनी धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने