पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीला होतोय गावामध्ये विरोध; मिरजेच्या दीडशे कुटुंबांनी सोडलं गाव

बेडग (ता. मिरज) या गावामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ येथील आंबेडकर अनुयायांनी बेडग ते मुंबई असा 'लॉग मार्च' सुरू केला आहे.

गावातील सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबीयांनी संसारोपयोगी साहित्य घेऊन संपुर्ण कुटूंब सोबत घेऊन गाव सोडले. 

बेडग गाव सोडून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या मागणीसह मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभारण्यात येत होती. पंरतु ती ग्रामपंचायतकडून १६ जून २०२३ रोजी अनधिकृत ठरवून पाडण्यात आली होती. याच्या निषेधार्थ मिरजेत आंबेडकर समुदायाने आंदोलन करीत जोरदार या घटनेचा निषेध करण्यात आला.


गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. आंदोलनानंतरही सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्याने समस्त आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने