भुजबळांच्या येवल्यात शरद पवार यांचा एल्गार.

'ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड' हू शरद पवार यांनी मंञी छगन भुजबळ यांना उद्देशून त्याच्या मतदार संघात आवाहनच दिले आहे. वयानुसार थांबले पाहिजे, या अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील 'ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड हूं', या ओळीची आठवण करून दिली. आताच्या मंत्रिमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो, त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती, त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे वय ८४ होते. केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे होतात, असेही शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पक्ष फुटीनंतर शरद पवार जाहीर सभा द्वारे बंडखोर मंत्र्यांना आवाहन देत आहेत लवकर त्याच्या पुढील मंञ्याच्या मतदारसंघात सभा होणार आहेत. 


शरद पवार यांनी सांगितले की 'ते' निवडून येणार नाहीत. 

राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे जनताच ठरवेल. मात्र, जे म्हणतात आमचा पक्ष बेकायदेशीर आहे. ते राष्ट्रवादीच्या नावानेच मंत्री कसे झाले? या बेकायदेशीर पक्षाच्या नियुक्त्या तुम्ही कशा केल्या? असा सवाल करून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर जे पक्ष सोडून गेले, ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावाही त्यांनी नाशकातील पञकारांशी संवाद साधताना केला. पवार म्हणाले, कुणाला फेरविचार करायचा असेल तर हरकत नाही; पण त्या चिमण्या राहिल्या नाहीत, या चिमण्यांनो.. असे म्हणण्याची स्थिती नाही. अशी पुष्टीही शरद पवार यांनी जोडली. 

अजित पवार गेले पण नातू रोहित पवार सांभाळत आहेत मैदान. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष फुटी नंतर अजित पवार गेल्यानंतर शरद पवार यांची नातू रोहित पवार नाशकातील मैदान व संभाव्य सभेच्या माध्यमातून त्यांची पाहणी केली. रोहित पवार अजित दादाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मैदान सांभाळतील असा सुतोवाच व्यक्त केला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने