.........अन् मी सुषमा अंधारे ( sushma andhare ) यांना दोन चापटा लगावल्या शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक दावा.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसून येत आहे. बंडखोरी होऊन जवळपास वर्ष होत आलं आहे. तरीही ठाकरे गटाची गळती थांबत नाहीये. दररोज कोणता ना कोणता ठाकरे सेनेचा नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे. नुकतेच पुणे जिल्हा प्रमुख यांनीही शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुख यांच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला असं असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शिवसेनेची बीडमध्ये सभा होणार आहे तत्पुर्वी या सभेचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या बीडमध्ये आल्या होत्या यावेळी बीडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये सुषमा अंधारे यांच्या समोरच तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे.




यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या आहेत. असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. यावेळी आप्पा जाधव यांनी बोलताना असे सांगितले आहे की, सुषमा अंधारे या त्यांच्या कार्यालयासाठी एसी सोफा इतर साहित्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे मागत आहेत यासह विविध पदांसाठी पैसे मागत असल्याचे सांगत मी पक्षासाठी कुटुंबाचा त्याग केला आहे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून पक्ष वाढवला आहे असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावल्याची व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आप्पा जाधव यांच्या या दाव्यावर सुषमा अंधारे ( sushma andhare ) यांना विचारले असता त्यांनी या दाव्याचे खंडन केले आहे, परंतु आप्पा जाधव यांचा प्रसारमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर शिवसेना ( sushma andhare ) पक्ष प्रमुखांनी आप्पा जाधव यांची पक्षातून व जिल्हा प्रमुख पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची निर्देश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने