PM Kisan Samman Yojana : या काही अटीमुळे तुम्ही पी एम किसान सन्मान योजने पासून राहू शकता वंचित.

 अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळतात लवकरच या योजनेअंतर्गत चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

आपला हार्ट रेट normal heart rate आहे तरी किती ?

परंतु ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्यांनी काही गोष्टीची पूर्तता तात्काळ करणे गरजेचे आहे यामध्ये ई केवायसी प्रामाणिककरण व बँक खाते आधार सोबत संलग्न करण्याची केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. या तीन बाबींची पूर्तता करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे तरच 14 वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतात यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे लागली त्यांच्या शेती कामासाठी किंवा घरगुती गोष्टीसाठी वापरता येतात यामध्ये कोणताही दलाल समाविष्ट नाही.



रोजच्या आहारातील हे पदार्थ करतात हाडे ठिसूळ.. वेळीच सावध व्हा.

शेतकऱ्यांनी या गोष्टीची तात्काळ पूर्तता करावी तरच जमा होईल 14 वा सन्मान हप्ता.


१. राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लॅंड सिडींग क्रमांक अद्ययावत करणे शासनाने बंधनकारक केले आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल. ही कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी तहसिलदार यांची असेल.

२.पीएम किसान सन्मान योजनेसाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया स्वतः लाभार्थी शेतकऱ्याला करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला गावांमधील किंवा शहरातील सीएससी केंद्र किंवा पीएम किसानच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

३. पी एम किसान योजनेचे पैसे ज्या खात्यामध्ये येतात ते खाते बँकेमध्ये आधारशी संलग्न असले पाहिजे यासाठी तुमची जी बँक आहे त्यामध्ये बॅंक खात्यात आधार संलग्न करावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने