रोजच्या आहारातील हे पदार्थ करतात हाडे ठिसूळ.. वेळीच सावध व्हा.

दरोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या काही चुकीच्या सवयी व खानपानाच्या चुकीच्या पध्दती शरीरातील कॅल्शियम कमी करतात आणि यांचा दुष्परिणाम म्हणून हाडे ठिसूळ होताना दिसून येतात. काही वेळा अजाणतेपणामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. अशा खाण्याच्या पदार्थाची माहिती असणे आवश्यक आहे. याकरिता काही खाण्यातील सवयी बदलणे गरजेचे आहे. मीठ मीठात सोडियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे मिठाचे आवश्यकतेपेक्षा अधीकचे सेवन तुमची हाडे ठिसूळ करू शकते. यामुळे मीठ शक्यतो आवश्यक तेवढेच आहारात वापरावे.
चहा-कॉफी चहा-कॉफीमध्ये असलेले कॅफीन या घटकामुळे कॅल्शियम कमी होऊ शकते. यामुळे चहा काॅफीचा अतिरेक टाळायला हवा. दारू दारूच्या व्यसनामुळे हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. दारूच्या अतिसेवनामुळे हाडांमधील कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. सीलबंद अन्नपदार्थ सीलबंद आणि पॅकिंग केलेले अन्नपदार्थ कमी प्रमाणात सेवन करावे. यामुळेही शरीरातील हाडे ठिसूळ होण्याच्या प्रमाणात शक्यता असते. कोल्ड्रिंक्स अतिरिक्त कोल्ड्रिंक्समुळे हाडांचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढू शकते. यामधील फॉस्फोरिक अॅसिड हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतले जाते. यामुळे हाडे कमजोर बनतात. टीप - कॅल्शियमवाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे तसेच आहारात कोणती पथ्ये पाळावीत, याविषयी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वरील सामान्य माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने